केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अंबिका सोनी यांनी त्याबाबतची माहिती दिली.
त्या म्हणाल्या, की पाच सदस्यांच्या एका पॅनेलने हे डिझाईन मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठविले होते. उदय कुमार यांनी तयार केलेले हे चिन्ह भारतीयत्व आणि आंतरराष्ट्रीयत्वाचे प्रतीक मानले जाते. देवनागरीतील र आणि रोमनमधील आर (कॅपिटल) याचा मेळ या चिन्हामध्ये साधण्यात आला आहे. अर्थ मंत्रालयाने चिन्हाच्या डिझाईनसाठी स्पर्धा आयोजित केली होती. त्यानुसार उदय कुमार यांना अडीच लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले. संगणकाच्या कीबोर्डमध्ये हे चिन्ह बसेल, आणि भारताची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळख त्यातून निर्माण होईल, ही या चिन्हामागील अट होती.
जगातील अन्य देशातील चलन चिन्हांद्वारे ओळखले जातात. आतापर्यंत भारतीय चलनाला आरएस आणि आरई याप्रकारे ओळखले जात होते. नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंकेतही रुपयाच्या माध्यमातून व्यवहार होत होते. आता मात्र या चिन्हामुळे भारतीय चलनाची जगात वेगळी ओळख निर्माण होणार आहे.त्याच बरोबर
देवनागरीचा वापर केलेला असल्याने एक मराठी म्हणून वेगळाच आनंद आहे....