majhi olakh

नमस्कार मित्रानो
माझे नाव युवराज मोहिते


शिक्षण जमतेम म्हणजे लिहता वाचता येते
जन्म गावी झाला आपल्या सांगली जिल्ह्यात कडेगाव तालुका आहे ना तिथे
तिथे म्हणजे कड़ेगावात नव्हे त्या तालुक्यातील तोंडोली गावात ।
 
चट्टान खंबीर,
         अन नाव हंबीर,
                   शिवबाचा वीर,
                                   तो खंदा!!!
भिडला तो,
           कटला वा मिटला,
                       सरनोबतासमोर,
                               क्षणभर ना टिकला,
                                        मग असो, कुणीही बंदा!!!
मोजता ही कधी, 
           यायची नाही,
                  मराठ्यांच्या, खजिन्यातली ,
                                  अनमोल रत्न-संपदा!!!

शब्द अपुरे, 
        सांगण्यास महती,
           धन्य झाली,
                  मराठी माती, 
                         पावुनी, पूत्र साजिंदा,
गर्वाने सांगू,
        वारसा त्यांचा,
                पायधुल मस्तकी,
                       अन प्राण-फुलानी, वंदा!!!
M मृत्युही,
    O ओशाळला,
         H हरला,
              I इथेच,
                 T तो,
                      E एकदा!!!!


मला आयुष्यामध्ये भरपूर पैसे कमवायचे आहेत, असे निदान सर्वांचेच स्वप्न असते. आणि मग काही लोक ते आपले स्वप्न रोजची नोकरी करता करता विसरुन जातात. तर काही लोक खरंच भरपूर पैसे कमवितात मग त्यासाठी ते एकतर ते आपली जिद्द आणि चिकाटी पणाला लागतात अथवा खोटेपणा अथवा कुणालातरी फसवून भरपूर पैसे कमवितात.
या भरपूर पैसे न कमविलेल्या आणि भरपूर पैसे कमविलेल्या लोकांमध्ये एक अशाही प्रकारची लोक असतात जी पैसे कमविण्याची त्याची जिद्द आणि चिकाटी पणाला लावतात, शक्य त्या सर्व गोष्टी करतात परंतू तरीही पैसे कमवू शकत नाही….. मी त्यातलाच एक.

तसे भरपूर पैसे कमविण्यासाठी कुणाला फसवायचे असते तर मी कधीच पैसेवाला झालो असतो, कारण डोक्यामध्ये एवढ्या भन्नाट कल्पना आहेत की त्या सांगून सगळीकडून पैसा कमविता आला असता. पण चांगले काम करुन देखिल पैसे कमविता येतात, फक्त त्यासाठी तुमची हुशारी आणि ज्ञान योग्य ठिकाणी वापरायला हवे असे मला वाटत होते आणि तेच सुरुवातीपासून करत आलो…. पण अजूनही भरपूर पैसे मिळाले नाहीत.

प्रसिद्धी मिळाल्यावर पैसा आपल्याकडे आपोआप येतो असे वाटायचे म्हणून मग प्रसिद्धी मिळवायची तर मग चांगले काम करुन मिळवूया. म्हणून शक्य तेवढी सर्व चांगली कामे करायला सुरुवात केली. सर्वात चांगले काम म्हणजे ज्ञान वाटण्याचे. माझ्या त्याच प्रयत्नांचे यश म्हणजे www.yuvrajmohite.com वेबसाइट प्रसिद्धी भरपूर मिळाली पण भरपूर पैसा कुठेच नव्हता.
याचा अर्थ असा नाही की www.yuvrajmohite.com भरपूर पैसे कमविण्याच्या दृष्टीने बनविली. मराठी माणूस हुशार व्हावा हा त्यामागचा उद्देश. दुसर्‍याला शिकवाल तर तुम्ही अधिक शिकाल याच विचाराने लहानपणापासून जे माहित होते ते दुसर्‍यांना शिकवित गेलो. शिक्षण चांगले नसल्याने ( परिस्थिती मुळे पाचवी मधून सोडावे लागले..) काहीतरी एक क्षेत्र चांगले असायला हवे म्हणून कॉम्प्युटरमध्ये लक्ष केंद्रित करुन करुन बरेच सॉफ्टवेअर कुठलाही कोर्स न करता शिकलो ( पैसे देऊन कोर्स करण्या सारखी परिस्थिति असती तर शिक्षण सोडले असते का ? ) आणि मग सर्वांना मोफत कॉम्प्युटरचे व मला माहिती असलेल्या विषयाचे ज्ञान मिळावे यासाठी नंतर www.yuvrajmohite.com वेबसाइट बनविली.

अगोदर मी डोर टू डोर जाउन वस्तु विकत होतो आता इतरांच्या वेबसाइट बनवून घर चालवितो.
( जर तुम्हाला ही वेबसाइट बनवून हवी असेल तर www.mightyindia.co.in या वेबसाइट वर मला संपर्क करा. ) पण अजूनही ते भरपूर पैसे कमविण्याचे स्वप्न डोक्यातून जात नाही.
स्वप्न त्यांना नाही म्हणत जी तुम्हाला झोपल्यावर पडतातं तर स्वप्न त्यांना म्हणतात जी एखादी गोष्ट मिळविण्यासाठी तुम्हाला झोपू देत नाही. भरपूर पैसे कमविण्याचे स्वप्न मला अजूनही व्यवस्थित झोपू देत नाही.

तुम्ही कुणालाही विचारा तुम्ही चांगले काम करता का तर ते तुम्हाला त्याच्या चांगल्या कामाचा पाढा वाचून दाखवतील… मला देवजाणे अजूनही भरपूर चांगले काम केले असे वाटत नाही. कारण मी आत्ता पर्यंत बर्‍याच अशा व्यक्ती पाहिल्या आहेत ज्या चांगले काम करतात पण त्यांचे काम कुणाच्याही दृष्टीस पडत नाही असे असले तरी त्यामूळे ते लोक त्यांचे काम थांबवित नाहीत. काही उपयोगी वेबसाइट बनविल्याने काही मोठे काम होत नाही असे मला वाटते. इथे मला माझ्या मनाचा मोठेपणा सांगायचा नाही तर खरंच जेव्हा मी स्वतःलाच विचारतो तेव्हा मला उत्तर मिळते की अजून बरीच कामे करायची आहेत आणि त्यासाठी वेळ फारच कमी आहे.

असो प्रयत्नांती परमेश्वर...........
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
;