हे बऱ्याच जणांना कोडं असतं. कारण या सगळ्या सोयी तर फुकट असतात।
तर याचं रहस्य म्हणजे जाहिराती।
गूगलच्या सर्च इंजिनवरुन माहिती हुडकून आपण एखाद्या वेब साईटवर गेलो की ती वेब साईट गूगलला त्यासाठी ठराविक दरानं पैसे देते।५०० पेक्षा जास्त वर्षांपूर्वी गुटेनबर्गनं आधुनिक छपाईयंत्राचा शोध लावून पुस्तकांद्वारे ज्ञानाचा प्रसार करायला सुरुवात केली।
त्यानंतर इतक्या मोठय़ा प्रमाणात आणि सहजतेनं माहिती आणि ज्ञानाचे खजिने सगळ्या जगाला उपलब्ध करुन देण्यात गूगलचा हात कोणीच धरु शकलेलं नाही।
७ सप्टेंबर १९९८ रोजी एका गॅरेजमध्ये लॅरी पेज आणि स्यर्गी ब्रिन यांच्या गूगलचा जन्म झाला।आणि १९ ऑगस्ट २००४ या दिवशी गूगल ही कंपनी शेअरबाजारात आली।
कंपनीची ‘किंमत’ गुंतवणुकदारांनी तब्बल २३ अब्ज डॉलर्स इतकी ठरवून तंत्रज्ञानविषयीच्या कंपन्यांच्या इतिहासात नवा विक्रमचा घडवला!
२००९ साली गूगलमध्ये सुमारे २०००० लोक काम करत होते आणि तिचं उत्पन्न २२०० कोटी डॉलर्सच्या घरात होतं।१९९५ साली स्टॅनफर्ड
विद्यापीठात पहिल्यांदा भेटले।दोघांचे स्वभाव अतिशय वेगळे असूनही त्यांना एकमेकाचा स्वभाव आवडतो आहे हे पटकन लक्षात आलं.
१९६० साली लॅरीचे वडील कार्ल मिशिगन विद्यापीठातून संगणकाविषयीच्या अभ्यासक्रमात पदवी आणि नंतर डॉक्टरेट मिळवणाऱ्या अगदी पहिल्या काही जणांमधले होते। लॅरीची आई ग्लोरिया हीसुद्धा संगणकक्षेत्रात काम करायची। नंतर दोघंही मिशिगन विद्यापीठात संगणकशास्त्र शिकवायचे. लॅरी ८ वर्षांचा असताना त्याच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. तो स्टॅनफर्डमध्ये शिकायला गेल्यावर त्याचे वडील वयाच्या ५८व्या वर्षी त्यांना लहानपणापासून असलेल्या पोलियोच्या आजारानं तीव्र स्वरुप धारण केल्यामुळे वारले. त्यानंतर कित्येक दिवस लॅरी अतिशय खिन्न असे.
स्यर्गी ब्रिनची आई युजेनिया नासामध्ये काम करायची. त्याचे वडील मायकेल मेरिलैंड विद्यापीठात गणित शिकवायचे आणि त्याविषयी संशोधनही करायचे। खरं म्हणजे ब्रिन कुटुंब मूळचं मॉस्कोमधलं. पण स्यर्गी ६ वर्षांचा असताना त्यांनी तत्कालिन ‘सोव्हिएत युनियन’ला रामराम ठोकत अमेरिकेची वाट धरली होती.
इंटरनेट हे कोळ्यानं विणलेल्या जाळ्यासारखं असतं हे आपण जाणतोच. या जाळ्यात आपल्याला एकीकडून दुसरीकडे जाण्यासाठी ‘लिंक्स’ असतात. त्या लिंक्सवर आपण जर माऊसनं क्लिक केलं तर आपल्याला त्या-त्या विषयासंबंधीची आणखी माहिती मिळते. उदाहरणार्थ बातम्यांच्या वेब साईटवर ‘भारताचा आजच्या सामन्यात विजय’ अशी लिंक असेल आणि आपण त्यावर क्लिक केलं तर आपल्याला त्या सामन्याविषयीची विस्तृत माहिती मिळेल. लॅरी पेज त्याच्या संशोधनासाठी इंटरनेटवरुन माहिती गोळा करताना ‘अल्टाव्हिस्टा’ नावाचं सर्च इंजिन वापरे. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपण हुडकत असलेल्या माहितीबरोबरच त्या माहितीशी संबंधित अनेक लिंक्सपण आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ आपण ‘ओबामा’ या शब्दावर सर्च केलं तर ओबामांशी संबंधित असलेल्या सगळ्या माहितीबरोबरच अमेरिकन निवडणुका, राजकारण अशा असंख्य प्रकारच्या लिंक्स आपल्याला दिसतील. यातल्या एका लिंकवर क्लिक करुन दुसरीकडे, मग तिथल्या लिंकवर क्लिक करुन तिसरीकडे, असं कुठवर होऊ शकतं आणि त्याचा वापर करुन आपण चक्क अख्खं इंटरनेटच आपल्या संगणकावर डाऊनलोड करु शकू का यादृष्टीनं त्याचे प्रयत्न सुरु झाले. त्यानंतर एखाद्या वेब साईटची किंवा वेब पेजची लोकप्रियता आणि म्हणूनच तिचं महत्त्व किंवा तिची ‘किंमत’ कशी ठरवता येईल या प्रश्नानं त्याला घेरलं. जगभरातल्या इतर सगळ्या वेब पेजेसवरुन एखाद्या वेब पेजला जितक्या लिंक्स आलेल्या असतील त्यावरुन त्याची लोकप्रियता ठरेल, असं मत त्यानं मांडलं. म्हणजेच जास्त लिंक्स असतील तर जास्त लोकप्रियता असा सोपा हिशेब त्यानं मांडला. त्याहूनही ती लिंक कुठून येतीये यावरुन त्या लिंकच्या लोकप्रियतेचं ‘वजन’ ठरवायचं असा आणखी जास्त महत्वाचा निष्कर्ष त्यानं काढला. उदाहरणार्थ जर याहूच्या वेब साईटच्या मुख्य वेब पेजमधून दुसऱ्या एखाद्या वेब पेजला लिंक आलेली असेल तर त्या लिंकचं ‘वजन’ आणि म्हणूनच त्या वेब पेजची लोकप्रियता जास्त समजायची. या संकल्पनेवर मग पेज, ब्रिन आणि ब्रिनचा तरुण प्राध्यापक सुनील मोटवानी याच्यासह काम सुरु केलं. अलिकडेच या मोटवानीचं त्याच्याच अमेरिकेतल्या घरामधल्या खासगी पोहोण्याच्या तलावात बुडून दुर्दैवानं निधन झालं.
जेव्हा ब्रिन आणि पेजचं काम बऱ्यापैकी पूर्ण झालं तेव्हा त्यांनी आपल्या कामाला जगापुढे मांडण्यासाठी एक वेब साईट काढायचं ठरवलं. त्यासाठी काही चर्चेनंतर ‘गूगॉल’ असं नाव ठरलं. या शब्दाचा अर्थ ‘१ या आकडय़ापुढे १०० वेळा ० लिहिल्यानंतर तयार होणारा आकडा’ असा आहे. आपण इतक्या प्रचंड प्रमाणात माहिती गोळा करुन ती लोकांना उपलब्ध करुन देणार आहोत की त्यामुळे सगळ्यांना ‘गूगॉल’ या शब्दाची आठवण येईल, अशी त्यामागची कल्पना होती. पण घाईघाईनं या वेब साईटचं नाव नोंदवलं जाताना त्याच्या स्पेलिंगमध्ये चूक झाली, आणि ते ‘गूगल’ असं झालं, आणि मग तेच नाव चिकटलं. सुरुवातीला गूगलची माहिती शोधायची सोय (‘सर्च इंजिन‘) फक्त स्टॅनफर्ड विद्यापीठातल्या लोकांना उपलब्ध होती. मग ती इंटरनेट वापरणाऱ्या जगातल्या सगळ्या जणांसाठी खुली करण्यात आली.
आता तर माहिती शोधण्याच्या मूळ सोयीखेरीज इमेल (जीमेल), ग्रुप्स, पुस्तकं, चित्रं, व्हिडीओज्, ऑर्कुट, फोटो साठवायची सोय, ऑनलाईन ऑफीस, नकाशे, आणि इतर अनेक गोष्टी गूगलनं उपलब्ध करुन दिल्या आहेत. जर गूगलची वेब साईट काही कारणानं उपलब्ध नसेल तर अनेक माणसांना रोजचं काम करणं अशक्य होईल अशी आता परिस्थिती आहे! गेल्या वर्षी ‘क्रोम’ नावाचा वेब ब्राऊझर बाजारात आणून गूगलनं सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. आता तर गूगल विंडोज आणि लिनक्ससारखी एक ‘ऑपरेटिंग सिस्टीम’ तयार करायच्या मार्गावर आहे.
या सगळ्यात गूगलला पैसा कसा मिळतो हे बऱ्याच जणांना कोडं असतं. कारण या सगळ्या सोयी तर फुकट असतात. तर याचं रहस्य म्हणजे जाहिराती. गूगलच्या सर्च इंजिनवरुन माहिती हुडकून आपण एखाद्या वेब साईटवर गेलो की ती वेब साईट गूगलला त्यासाठी ठराविक दरानं पैसे देते. तसंच आपल्या सगळ्या साईट्सवर गूगल अनेक कंपन्यांच्या जाहिराती करत असते. आपलं सर्च इंजिन अनेक कंपन्यांच्या वेबसाईट्सवर वापरायला देते. त्यातून गूगलला भरघोस उत्पन्न तर मिळतंच, पण शिवाय सामान्य लोकांच्या दृष्टीनं सगळ्या साईट्स फुकट असल्यानं गूगलची लोकप्रियताही वाढतच राहते.
अर्थात गूगलचं सगळंच काम सुरळीतपणे चालू आहे, असं नाही. आपण गूगल वापरत असताना आपल्या नकळत गूगल अनेक प्रकारची माहिती गोळा करत असते. याचं कारण असं की आपण गूगल इतक्या मोठय़ा प्रमाणावर वापरतो की त्यातून आपल्याविषयी अनेक प्रकारची माहिती मिळवणं गूगलला सहज शक्य असतं. उदाहरणार्थ आपण कुणाला इमेल्स पाठवतो किंवा आपल्याला कोण इमेल्स पाठवतं, त्याचे विषय काय असतात, ऑर्कुटवर कुठल्या प्रकारच्या मित्रमैत्रिणींशी आपण जवळीक साधतो, गूगलवर कुठली माहिती आपण शोधतो, कुठल्या कुठल्या लिंक्सवर आपल्या माऊसनं क्लिक करतो, कुठले व्हीडिओ किंवा चित्रं शोधतो, अशा असंख्य प्रकारच्या गोष्टींमधून आपण अप्रत्यक्षरित्या गूगलकडे आपल्याविषयी अक्षरश: माहितीचा खजिनाच तयार करत असतो. त्या सगळ्या माहितीचं विश्लेषण करुन गूगलला आपल्याविषयी अफाट माहिती मिळते. उदाहरणार्थ आपण वारंवार सिनेमाविषयीची माहिती शोधत असलो तर नवीन सिनेमा आला की त्यासंबंधीच्या जाहिराती गूगल अगदी आपल्या नकळत आपल्यासमोर सादर करु शकते. एकूणच या सगळ्या प्रकारातून गूगल आपल्या आवडी-निवडी, सवयी, मित्रमैत्रिणी या गोष्टींविषयी अंदाज बांधून आपल्याला काय आवडेल यादृष्टीनं जाहिरातबाजी करत असते. पण त्याहुन गंभीर बाब म्हणजे आपली खाजगी माहिती गूगलकडे मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होते असा आरोप गूगलवर होत असतो. आणि या आरोपात बऱ्यापैकी तथ्यसुद्धा आहे. कारण उद्या समजा ही माहिती गूगलनं कुणाला विकली तर आपल्या नकळत आपल्याविषयीचा डेटाबेसच भलत्याच माणसाच्या किंवा कंपनीच्या हाती लागू शकतो!
गूगलला जाहिरातींच्या माध्यमातून पैसा कमवायच्या धंद्यातलं मर्म ओळखून काही भामटय़ांनी ‘क्लिक फ्रॉड’ नावाचा एक नवाच मार्ग अवलंबला. या उद्योगाचं स्वरुप म्हणजे काही बोगस कंपन्या चक्क माणसं नेमून गूगलच्या वेब साईटवर दिसत असलेल्या कंपन्यांच्या लिंक्सवर चक्क दिवसभर क्लिक करत बसायला सांगतात. म्हणजे समजा एखाद्या माणसानं गूगलच्या वेब साईटवर पुस्तकांविषयीची माहिती शोधली तर ती माहिती दाखवतानाच गूगल दोन-चार पुस्तक विक्रेत्यांच्या जाहिरातीसुद्धा त्या माणसाला दाखवते. आता जर त्या माणसानं अशा पुस्तकांच्या दुकानांपैकी एखाद्या दुकानाच्या जाहिरातीच्या लिंकवर क्लिक केलं तर साहजिकच त्या माणसाच्या संगणकात त्या पुस्तकांच्या दुकानाची वेब साईट उघडेल. म्हणजेच गूगलमुळे त्या पुस्तकांच्या दुकानाला एक नवीन ग्राहक मिळायची दाट शक्यता निर्माण झालेली असते. आपल्याला गूगलनं अशा रीतीनं नवीन ग्राहक मिळवून दिल्याबद्दल साहजिकच त्या पुस्तकविक्रेत्या कंपनीला ठराविक दरानं गूगलला पैसे द्यावे लागतात. आता या उदाहरणात जर एखाद्य बोगस कंपनीनं अशा रीतीनं चक्क माणसं नेमून गूगलच्या वेब पेजेसवर दिसणाऱ्या लिंक्सवर दिवसरात्र क्लिक करायला लावलं तर उगीचच प्रत्यक्षात ग्राहक नसलेल्या माणसांच्या या ‘क्लिक्स‘साठी गूगलला पैसे मिळतात! त्यामुळे गूगलचा फायदा होतो आणि जाहिरात करणाऱ्या कंपन्यांचा जाहिरातींवर होणारा खर्च विनाकारण वाढत जातो!
आपल्याकडे वर्तमानपत्रांमध्ये बरेचदा ‘घरबसल्या फक्त इंटरनेटचा वापर करुन हजारो रुपये कमवा’ अशा प्रकारच्या जाहिराती येत असतात. त्यातल्या काही जाहिराती अशा प्रकारे ‘क्लिक फ्रॉड’ करण्यासाठीच्यासुद्धा असतात. आपण अजाणतेपणानं एका प्रकारच्या भामटेगिरीला हातभार लावतोय हे अर्थातच या जाहिरातींना बळी पडणाऱ्यांच्या लक्षात येत नाही.
गूगलच्या काही हितशत्रूंनी तर गूगलच अशा प्रकारे लोकांना नेमून त्यांच्याच वेब साईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक्सवर दिवसरात्र क्लिक करत बसायला सांगतं असा आरोप केला होता. साहजिकच त्याच्या मोबदल्यात गूगलला फुकट पैसे मिळत राहतात असं म्हटलं जायचं! पण या आरोपात काही तथ्य निघालं नाही. आता या प्रकारांवर आळा घालण्यासाठी नवनव्या युक्त्या वापरल्या जातात. उदाहरणार्थ नुसत्या क्लिकला महत्व न देता गूगलवरची जाहिरात बघितल्यावर त्या माणसानं त्या दुकानदाराकडून काही खरेदी केली तरच त्या कंपनीनं गूगलला जाहिरातीचे पैसे द्यायचे, वगैरे.
अनेक ठिकाणी ‘एका निर्जन बेटावर तुम्हाला एकटय़ाला एकच गोष्ट घेऊन राहायचं असेल तर तुम्ही तिथे काय मागाल?’ असा प्रश्न विचारला जातो. आता अनेक जणांचं उत्तर आता ‘गूगल’ आलं नाही तर आश्र्चर्य वाटेल अशी परिस्थिती आहे