happy independence day



१५ ऑगस्ट २०११ हा भारताचा ६४ वा स्वातंत्र्यदिवस आहे .
१५ ऑगस्ट आणि तिरंगा म्हटले की भारत देश, असे भारतवासियांच्या आणि इतर देशातल्या लोकांच्या नजरे समोर येते. १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिवस म्हणून तर तिरंगा हा राष्ट्रीयध्वज म्हणून. तिरंगा म्हणजे ३ रंग असलेला राष्ट्रीयध्वज.
भारताचा तिरंगा हा २२ जुलै १९४७ रोजी, भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या २४ दिवस आधी अंगिकारला गेला. भारतीय राष्ट्रध्वजात गडद भगवा, पांढरा व हिरवा ह्या तीन रंगांचे आडवे पट्टे आहेत. गडद भगवा रंग सगळ्यात वरती, मध्यभागी पांढरा व खालच्या भागात हिरवा रंग, पांढर्‍या रंगावर मध्यभागी निळ्या रंगात अशोकचक्र, अशी आपल्या तिरंग्याची रचना केलेली आहे. मछलीपट्टणम जवळ जन्मलेल्या पिंगली वेंकय्या ह्यांनी तिरंग्याची रचना केली आहे.
भारतीय राष्ट्रध्वजाच्या लांबी व उंचीचे प्रमाण ३:२ असे आहे, तसेच राष्ट्रध्वज खादीच्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहे. त्याचा वापर कसा करायचा ह्याचे नियम भारतीय सरकारने तयार केलेले आहे. गडद भगवा रंग हा त्यागासाठी वापरला आहे. पांढरा रंग प्रकाश, सत्येची वाट दर्शवण्यासाठी वापरला आहे. हिरवा रंग हरित झाडे व शेती ज्यावर भारतीयांचे जीवन अवलंबून आहे हे दर्शवण्यासाठी वापरला आहे. अशोकचक्र हे ह्या ध्वजाखाली राहणार्‍या भारतीयांनी सत्येची कास धरावी हे दर्शवण्यासाठी वापरले आहे. भारताचा तिरंगा हा तीन रंगाच्या पट्ट्यात आहे व अशोकचक्र हे निळ्या रंगात. तसे पाहिलेतर ध्वजात ४ रंग वापरले आहे. पण मुख्य ३ रंगाचे पट्टे आहे म्हणून ह्याला तिरंगा म्हणतात.
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
;