girni kamgaranna MMRDA chi 75 Hajar Ghare

Kamgar
Girani Kamgar

गिरणी कामगारांना एमएमआरडीएची ७५ हजार घरे ! दहा दिवसांत नोटिफिकेशन !

मुंबई, शुक्रवार – गिरणी कामगारंसाठी आजचा दिवस आनंदाचा तरला आहे ! १ लाख ४६ हजार गिरणी कामगारांना घरे मिळावी यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधान भवनात विशेष बैठक घेउन दीड तास चर्चा केली आणि अत्यंत सहानुभूतीने विचार करून गिरणी कामगारांना दिलासा दिला. या बैठकीला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि ग्रहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर उपस्थित होते. सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनाही गिरणी कामगारांसाठी ही बैठक व्हावी यासाठी पर्यंत केले.
   आजच्या बैठकीत अत्यंत महत्वाचे निर्णय झाले. १)एमएमआरडीए एकूण १ लाख घरे बांधणार आहेत. यापैकी ७५ हजार घरे गिरणी कामगारांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. ही घरे गिरणी कामगारांना मालकी हक्काने दिली जाणार आहेत. या घरांचा आकार ३०० ते ३२० चौरस फुट असणार आहे.
    एमएमआरडीएची घरे भाडेतत्वावर देण्याच्या योजनेत बदल करून परावडणारी घरे बांधण्याची ही योजना असणार आहे. नियमावली बदलात प्रदीर्घ वेळ जातो, ही तक्रार मान्य करून मुख्यमंत्री दहा दिवंसात नोटीफिकेशन काढण्याचे आदेश एमएमआरडीएला दिले. नोटिफिकेशननंतर दोन महिन्यांत नियमावली बदलाची प्रक्रिया पूर्ण होऊन दीड ते दोन वर्षात घरे तयार होतील, असे नगरविकास खात्याचे सचिव मनु श्रीवास्तव यांनी संगीताले.
     २) म्हाडाने गिरणी कामगारांसाठी बांधलेल्या पहिल्या घरांची लॉटरी निघून वाटप सुरु झाले आहे. मात्र म्हाडाने पुढील १२ जमिनींवर घरे बंधन्यास अध्याप सुरुवात केलेली नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज आदेश दिले की, गिरणी कामगार नेत्यांशी चर्चा करून त्यांना सर्वे आकडेवारी दाखवून घरांच्या किंमती ठरवाव्यात आणि त्वरित बांधकाम सुरु करावे.
      ३) ज्या गिरणी कामगाराला लॉटरीत घर लागले आहे तो ह्यात नसेल आणि त्याच्या विधवा पत्नीच्या नावाने जर सर्व वारसांनी (मुलांनी) प्रतिज्ञापत्र लिहून दिले की, आईला घर देण्यास आमची हरकत नाही तर असे प्रतिज्ञापत्र पुरेसे मानले जाईल. हे प्रतिज्ञापत्र दिले तर विधवा पत्नीला वारसाहक्क  पत्र अर्थात सक्सेशन सटीफिकेट देण्याचे गरज नाही.
       ४) गिरण्याच्या चाळीत आजपर्यंत जे राहात आहेत त्यांच्या नावावर ती घरे केली जातील असे नोटिफिकेशन काढले जाईल.२००० सालच्या नंतरच्या कामगारानाही यामुळे संवक्षण मिळेल.
           गिरणी कामगारांच्या घरांच्या व इतर प्रश्नांवर वेगाने मार्ग शोधण्यासाठी ग्रहनिर्माण नागरी विकास, म्हाडा, एमएमआरडीए अशा संबधीत खात्यांच्या सचिवांची विशेष समिती नेमून ही समिती गिरणी कामगार नेत्यांच्या संपर्कात राहणार आहे. आजच्या बैठकित अप्पर मुख्य सचिव महसूल व वन विभाग, प्रधान सचिव, नगर विकास प्रधान सचिव, विधी व न्याय, सचिव कामगार, आयुक्त पालिका, उपाध्यक्ष म्हाडा, आयुक्त एमएमआरडीए, आयुक्त पालिका, उपाध्यक्ष म्हाडा, आयुक्त कामगार हे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

गिरणी कामगारांचे प्रतिनिधी म्हणून ‘नवाकाळ’ संपादक जयश्री खाडिलकर-पांडे, गिरणी कामगार संघर्ष समितीचे  दत्ता इसवलकर व प्रविण घाग,राष्ट्रीय मिल मजदूर संघर्ष सरचिटणीस गोविंद मोहिते व निवृत्ती देसाई, महाराष्ट्र गिरणी कामगार युनियनचे जयप्रकाश भिल्लारे, सेन्चुरी मिल कामगार एकता मंच नंदू पारकर व हेमंत गोसवी उपस्थित होते. एमएमआरडीए आणि इतर प्र्श्नांसाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट मिळावे यासाठी या संघटना सतत प्रयत्नशील होत्या.
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
;