दत्त

Datt
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा
नेति नेति शब्द न ये अनुमाना
सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥१॥
सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त
अभाग्यासी कैसी न कळे ही मात
पराही परतली तेथे कैचा हा हेत
जन्म मरणाचा पुरलासे अंत ॥२॥
दत्त येऊनिया उभा ठाकला
भावे साष्टांगेसी प्रणिपात केला
प्रसन्न होउनी आशीर्वाद दिधला
जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥३॥
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान
हरपले मन झाले उन्मन
मी तू पणाची झाली बोळवण
एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान ॥४॥
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
;