Lock your folders without software |
विना सॉफ्टवेअर फोल्डर लॉक करा.
1. सगळ्यात अगोदर कोणत्याही Drive मध्ये एक फोल्डर बनवा.
उदाहरणार्थ :- तुम्ही एक फोल्डर बनवला " D " Drive मध्ये " Yuvraj " या नावाने. खाली चित्रात दाखवल्या प्रमाणे.
2. आता Notepad ओपन करा. व त्या मध्ये खाली दिलेला कोड कॉपी करून पेस्ट करा.
ren Yuvraj Yuvraj.{21EC2020-3AEA-1069-A2DD-08002B30309D}
Advertising |
3. आता ज्या Drive मध्ये " Yuvraj " नावाचा फोल्डर बनवला आहे त्याच Drive मध्ये Notepad ची फाइल "loc.bat" या नावाने save करा.
4. आता आणखी एक नवीन Notepad फाइल ओपन करा व त्या मध्ये खाली दिलेला कोड कॉपी करून पेस्ट करा.
ren Yuvraj.{21EC2020-3AEA-1069-A2DD-08002B30309D} Yuvraj
5. पुन्हा त्याच Drive मध्ये (ज्या Drive मध्ये " Yuvraj " नावाचा फोल्डर बनवला आहे) ही नवीन Notepad ची फाइल "key.bat" या नावाने save करा.
तुमचे काम झालेली आहे. आता जी " फाइल " व " फोल्डर " किंव्हा असे काही जे तुम्ही लोकांपासून लपवू इच्छिता ते " Yuvraj " या फोल्डर मध्ये टाका.
आणि फोल्डर Lock करण्यासाठी " loc " वाल्या आइकन वर क्लिक करा. व Unlock करण्यासाठी " key " वाल्या आइकन वर क्लिक करा.
तुम्ही फोल्डर कोणत्याही नावाने बनवू शकता. " Yuvraj " हे नाव तुम्हाला समजण्या साठी वापरले आहे.
महत्वाची माहिती { ही Trick फोल्डर Lock करत नाही तर जेव्हा तुम्ही " loc " वाल्या आइकन वर क्लिक करता तेव्हा तो फोल्डर तुमच्या PC च्या एका Option चा शॉर्टकट तयार होतो. आणि " key " वाल्या आइकन वर क्लिक करता तेव्हा तो फोल्डर पुन्हा सामान्य होतो. }