आज मी तुम्हाला एक खूप सोपा उपाय सांगणार आहे. ज्याचा वापर तुम्ही कोणतीही वेबसाइट तुमच्या पीसी वर ब्लॉक करण्या साठी करू शकता.
1. सगळ्यात अगोदर खाली दिलेला अडड्रेस कॉपी करून स्टार्ट मेनू मध्ये जाऊन Run मध्ये पेस्ट करा.
C:\windows\system32\drivers\etc
आता एक " hosts " नावाची फाइल दिसेल ती Notepad मध्ये ओपन करा.
2. त्यामध्ये समोर दिलेली लाइन शोधा. " 127.0.0.1 Local host "
3. आता या लाइनच्या खाली तुम्हाला जी वेबसाइट ब्लॉक करायची आहे तिचा अडड्रेस लिहित जा.
4. एका लाइन मध्ये एकच वेबसाइट अडड्रेस लिहा.
5. अडड्रेस लिहित असताना IP add चा नंबर वाढवून लिहा.
उदाहरणसाठी
127.0.0.1 localhost
127.0.0.2 www.facebook.com
127.0.0.3 www.gmail.com
127.0.0.4 www.twitter.com
आता त्या फाइल ला सेव करा. आणि कॉम्प्युटर ला रीस्टार्ट करा.
आता कोणी या वेबसाइट ओपन नाही करू शकणार ज्या तुम्ही ब्लॉक केलेल्या आहेत.