Jeev Rangala

जीव रंगला...


जीव दंगला गुंगला रंगला असा..
पीरमाची आस तू ..
जीव लागला लाभला..
ध्यास ह्यो तुझा..
गहिवरला श्वास तू..

पैलतीरा नेशील..
साथ मला देशील..
काळीज माझं तू ..

सुख भरतीला आलं..
नभ धरतीला आलं..
पुनवचा चांद तू..

जीव दंगला गुंगला रंगला असा..
पीरमाची आस तू ..
जीव लागला लाभला..
ध्यास ह्यो तुझा..
गहिवरला श्वास तू..

चांद सुगंधा येईल..
रात उसासा देईल ..
सारी धरती तुझी..
रुजाव्याची माती तू..

खुलं आभाळ ढगाळ..
त्याला रुढीचा ईटाळ..
माझ्या लाख सजणा..
हि काकणाची तोड माळ तू..
खुण काळीज हे माझं तुला दिलं मी आंदन..
तुझ्या पायावर माखीन माझ्या जन्माचं गोंदण..

जीव दंगला गुंगला रंगला असा..
पीरमाची आस तू ..
जीव लागला लाभला..
ध्यास ह्यो तुझा..
गहिवरला श्वास तू..
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
;