Showing posts with label happy valentine day. Show all posts
Showing posts with label happy valentine day. Show all posts

आला प्रेमदिवस!!!!!!!!

आज आला प्रेमदिवस,
तिची आठवण घेऊन !
आठवणींबरोबर खूप सार्या,
असह्य वेदना घेऊन!

आज तिची वाट पाहत,
पुन्हा वळणावर उभ राहायचं!
येणार नाही, माहित असूनही,
गिफ्ट तिला घेऊन जायचं !

पानावतीलही डोळे,
अशा वेदनामय क्षणी!
संगतीत घालवलेले दिवस,
अन नाजुकश्या आठवणी!

तिच्या वेदनेत सुद्धा,
एक वेगळाच गोडवा असतो!
किती त्रास झाला तरी,
तो हवा-हवासाच असतो!

प्रत्येक वर्षी एकदा,
हा प्रेमदिवस येणार!
आठवणींमध्ये तिच्या,
मला जाळत राहणार!

        हॅप्पी व्हॅलेंटाईन्स डे.........

ती आणि मी...............!!!

रात्र सरली तिची वेळ झाली
फ्रेन्डसच्या खिडकीत मला ती दिसली
प्रोफाईलला माझ्या जरी, तिची व्हिजीट नव्हती
माहित आहे तिची, एक फेक प्रोफाईल होती
माझ्या स्क्रॅपबुकात तिला, रस आहे भारी.....

माहित आहेत तिला, माझ्या ओळखीच्या पोरी
वाचते ती सारे, बघते ती सारे
वाहतात नेटमधून माझ्याकडे वारे..

कम्युनिटीत ती दिसत नाही जरी
डोक्यावर पाय देउन फिरतेस तू पोरी
लपविलेस किती तरी, ओळख मिटणार नाही
कवितेचा बाज तुझ्या, कधीच लपणार नाही

त्यापेक्षा ये ना एकदा तू सामोरी
हरण्याची या खेळात असते.. वेगळीच खुमारी

हॅप्पी व्हॅलेंटाईन्स डे


Related Posts Plugin for WordPress, Blogger...
;