Ja Dile Mann Tula


जा जा जा दिले दिले मन तुला- कवि संदीप खरे
(संदीपच्या या कवितेला सलीलदादांनी अफलातून चाल दिलेली आहे. गीते एकदम झकास बनले आहे.)

कवितेमागची थीम -
"शंभर लोकांचा आपल्यावर जीव असतो. पण आपल्याला नेमकी एकशे एकावी व्यक्ती आवडते. आणि त्या व्यक्तीला मात्र दुसरेच कोणीतरी आवडत असते. मग आपला अहंकार दुखावला जातो कुठेतरी. अश्या दुखावलेल्या अंतःकरणाने केलेली ही कविता आहे. यात एक प्रकारचा ऍरोगन्स आहे. मात्र चाल देताना, कंपोझ करताना खुप मजा आली. यातील शब्दांचे प्लेसिंग छान जमले आहे. "



जा जा जा दिले दिले मन तुला
कर त्याचे तू काही..काही... दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही...॥धृ॥

फुल मनाचे खुडून...दिले तुझिया हातात
ठेव ओंजळीत किंवा सोड काळाच्या नदीत
देठ पिकल्या फुलांना..देठ तुटल्या फुलांना...देठ पिकल्या फुलांना..
भय निर्माल्याचे नाही
दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही... ॥१॥

जा जा जा दिले दिले मन तुला
कर त्याचे तू काही..काही... दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही...

तुला द्यावे मन.. असे काही कारण नव्हते...
एवढेच म्हणू आता, तुझ्या नशिबात होते..
पडे त्याच्या हाती दिवा..पडे त्याच्या हाती दिवा..पडे त्याच्या हाती दिवा..
ज्याला दिसतच नाही
दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही... ॥२॥

जा जा जा दिले दिले मन तुला
कर त्याचे तू काही..काही... दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही...

मनाविण जगताना, वाटे मलाही बरेच
आता दुःख-बिख नाही..वाटे आश्चर्य सखेद
मला एक मन भारी..मला एक मन भारी..मला एक मन भारी..
तुला दोन्ही जड नाही..
दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही... ॥३॥

जा जा जा दिले दिले मन तुला
कर त्याचे तू काही..काही... दिले दान पुन्हा घेणे माझ्या स्वभावात नाही...

कवि - संदीप खरे
गायक व संगीतकार - डॉ. सलील कुलकर्णी
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
;