Time Nit Vapral Tar......


वेळ नीट वापराल,तर आयुष्य घडवाल !


      माणसाला यश मिळवायचे असेल, आयुष्यात काही तरी करून दाखवायचे असेल तर त्याला वेळेचा योग्य वापर करण्याचे गणित जमलेच पाहिजे. पण माणसाला वेळेची किमंत कधीच वेळेवर कळत नाही. वेळ ही अशी गोष्ट आहे कि जि मिळवण्यासाठी कधीही पैसा खर्च करावा लागत नाही. त्यामुळेच कि काय वेळेचे मूल्य माणसाला समजत नाही. कोणतीही गोष्ट वेळेत केली की आपले आयुष्य सोपे होऊन जाते. शाळेतून घरी आल्यावर उनाड्यक्या करण्यात वेळ घालवायचा आणि झोपी जायची वेळ आली की आपल्याला गृहपाठ करायचा राहिलाय हे आठवणार. मग रात्री जागून आपण कसा तरी गृहपाठ पूर्ण करतो. हे असे घडते याचे कारण आपल्याला कोणत्याही गोष्ट वेळेवर करण्याचे महत्त्वच समजत नाही. वेळ उलटून गेल्यावर माणसाला वेळेची किमंत कळते. बारावीच्या आणि सीइटीच्या परीक्षेवेळी कसून अभ्यास करयचा नाही. मग नापास झाल्यावर किंवा इंजिनीअरिंग, मेडिकलला प्रवेश मिळाला नाही कि, आपण त्या ‘वेळी’ अभ्यास केला असता तर किती बरे झाले असते,’ त्या मुलाला वाटू लागते. पण नंतर पच्याताप करून उपयोग वेळ उलटून गेलेली असते. काही कामधंदा न करता अंथरूनावर लोळत पडायचे आणि परमेश्वाराकडून सर्व काही मिळेल, अशी अपेक्षा बाळगत बसायची ही खास भारतीय प्रवृत्ती आहे. कॉटवर लोळत पडून पेपर, मासिके वाचणे, टीव्ही बघणे यात शरीराला आणि मनाला सुख मिळत असले तरी विरंगोळा, विश्रांती म्हणून करणे ठीक असते. तुम्ही जर दिवस दिवस जर अशा पद्तीने कॉटवर लोळत वेळ घालवला तर आयुष्यात तुम्ही काहीही बनू शकणार नाही माणसाने आयुष्यात काही तरी ध्येय ठेवलेले असते.हे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक मिनिटाचा उपयोग करावा लागतो. त्यासाठी आपल्या जीवनाला शिस्त लावून घेणे गरजेचे असते. सकाळी सहा वाजता उठून, आन्हिक वैगरे आटोपून नऊ- दहाच्या सुमाराला घराबाहेर पडले पाहिजे, असे वेळापत्रक तयार करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करता येणे आपल्याला जमले पाहिजे. काही काही जण वेळापत्रक तयार करतात . काही दिवस त्याप्रमाणे वागतातही, पण पुढे मनावर आळस चढू लागतो. ठरलेली कामे वेळेवर होत नाहीत. मग आपले ध्येय  गोठ्नेही अवघड होऊन बसते. अशा वेळी नशिबाला बोल लावून मोकळे होणे सोपे असते. पण अनेकदा नशिबाचा आपल्या अपयशात काहीही वाटा नसतो. अपयश येण्यात तुम्ही आपली कामे वेळेवर न करणे हे मुख्य कारण असते. तुम्ही एकदा धंदा चालू केला, धंद्यातील मोठी ऑर्डर तुम्हाला मिळाली. तर आपले सारे लक्ष ते काम पूर्ण करून देण्याकडे लागायला हवे. त्यासाठी रात्रीचा दिवस करण्यची तयारी ठेवायला हवी. अशा प्रसंगात तुम्ही संध्याकाळी सात वाजताच घरी जाऊन आराम करू लागला तर तुमच्या कामगारांना वाटेल, मालकालाच त्या कामाची फिकीर नाही, आपण तरी ओव्हरटाएम करून काय उपयोग ? कामगारही ढिले पडतात.

     परिणामी तुम्हाला मिळालेली ऑर्डर वेळेत पूर्ण करून देण्यात तुम्हाला अपयश येते. तुमचे नाव बाजारात खराब होते. वेळ न पाळल्याचा फटका तुम्हाला असा बसतो. त्यामुळे तुम्ही वेळेचे व्यवस्थापन करणे शिकून घेतलेच पाहिजे. त्यासाठी खालील टिप्स लक्षात ठेवा:

१)      सर्वात प्रथम आपण आपला वेळ कसा खर्च करतो याचा अभ्यास करा. त्यासाठी सलग सात आठ दिवस आजचा दिवस मी असा घालवला या पद्धतीने आपले दररोजचे कार्यक्रम लिहिणे आवश्यक आहे. असे केले तर तुम्हाला आपण कोणत्या गोष्टीवर किती वेळ खर्च कतो हे लक्षात येईल. उदा. – पेपर वाचण्यात मी आठवड्यातले पाच सहा तास घालवले, टीव्हीवरचे कार्याक्रम पाहण्यात मी २४-२५ तास घालवले, इंटरनेट सर्फिंग करण्यात मी आठ – दहा तास घालवले, इ. अशा गोष्टी तुमच्या लक्षात येतील. मग आपण या गोष्टीवर एवढा वेळ घालवणे खरोखरच योग्य होते का, याचा विचार करा. आपण टीव्हीवरचे कार्यक्रम पाहण्यात आणि इंटरनेट सर्फिंग करण्यात जरा जास्तीत वेळ खर्च केलं, असे तुम्हाला मनापासून वाटले तर पुढच्या दिवसापासून त्या गोष्टी वरील वेळा खर्च करणे कमी करा. तुम्ही जर विध्यार्थी असाल तर हा वेळ आपल्याला आपला अभ्यास करण्यासाठी खर्च करता आला असता. तुम्ही जर व्यावसायिक असाल तर हा वेळ तुम्हाला व्यवसाय वृद्धीसाठी खर्च करता आला असता. यातून आपल्याला असे अढळून येईल कि, आपण अनेक छोट्या मोठ्या गोष्टीत फुकट वेळ खर्च करत असतो. काही चांगले शिकायचे असेल, आयुष्यात काहीतरी ध्येय साध्य करायचे असेल तर असा फुकट वेळ खर्च करणे प्रथम बंद करा.

२)      आपण दिवसात वेळ कसा करच करतो हे लक्षात आल्यावर प्रथम आपले दिवसाचे वेळापत्रक आखा. कोणत्या गोष्टीला किती वेळ द्यायचा हे त्या वेळापत्रकात नमूद करा. या वेळापत्रकाचे काटेकोर पालन कसे होईल.याकडे लक्ष ध्या. वेळापत्रक तयार करण्यात जो उत्साह दाखवला असेल तो ते पाळण्यासाठी दाखवला पाहिजे. नाहीतर आपण आरंभशूर ठरू. ठरलेल्या वेळात आपली कामे पूर्ण करण्याचा पर्यंत करा. म्हणजे तुम्ही ज्या ज्या गोष्टीसाठी वेळ खर्च करण्याचे ठरवले आहे त्या गोष्टीसाठी तुम्ही वेळ देऊ शकाल.

३)      वेळापत्रकाचे पालन सुरु केल्यानंतर एक आठवडा झाला कि मागील आठवड्यात काय काय झाले याचा आढावा घ्या. आपण ठरवलेल्या गोष्टी साध्य करू शकलो का.हे स्वत:च्या मनाला प्रामाणिकपणे विचारा. या प्रश्नचे उत्तर अर्धे होकारथी आणि अर्धं नाकारथी असेल तर पुढच्या आठवड्यात काही झाले तरी वेळापत्रक पाळायचेच, असं निश्चय करा. आपण मानाने ठरवले तर बरेच काही होऊ शकते, हे लक्षात ठेवा.

४)      जर तुम्ही विवाहित असाल तर मित्रमंडळी, पार्ट्या, ऑफिस यातच आपला जास्त वेळ खर्च होत आहे, हे लक्षात घेऊन वेळापत्रकात कुटुंबीयांसाठी ठराविक वेळ राखीव ठेवत जा. कुटुंबियांसाठी वेळ खर्च केला तर अनेक संभावात कौटुंबिक समस्या टळू शकतील.

५)      आता आपल्याला कोणती उदिष्टामुळे काय काय करावे लागेल, हे निश्चित करून   
   त्याप्रमाणे आपले वेळापत्रक आखा.

६)      आपल्या वेळापत्रकाचे पालन होते आहे की नाही यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी (तुम्ही जर अविवाहित असाल तर)आपल्या आई-वडिलांकडे सोपवा.

७)      आपण जे ध्येय ठरवले होते ते साध्य होते आहे की नाही याचा काही दिवसांनी आढावा घ्या.
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
;